पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नागपूरमधील काँग्रेसच्या एका नेत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या नेत्याचं नाव शेख हुसेन असे असून ते नागपूरचे शहराध्यक्ष आहे. एफआयआर दाखल केल्याने काँग्रेसचे नेते शेख हुसेन अडचणीत आले आहे.
नागपूर भाजपने दाखल केली तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री हुसेन यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि ५०४ आयपीसी (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. सध्या काँग्रेस राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर काढलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत एक विधान केले होते. या केलेल्या विधानामुळे नागपूर भाजपने तक्रार दाखल केली आहे.
(हेही वाचा – “धरण उशाला आणि कोरड घशाला”, म्हणत भाजपचा जालन्यात ‘जल आक्रोश मोर्चा’)
नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने हंगामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. याच निषेधार्ह सोमवारी नागपुरातील ईडी कार्यालयाबाहेर विदर्भातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. तसेच काँग्रेसने याच कारवाईवरून केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान एका सभेत बोलताना शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.
काय केलं शेख हुसेन यांनी वक्तव्य
https://twitter.com/MVAGovt/status/1536920435358572544