मुख्यमंत्री सरकार नाही तर केवळ कार चालवतात, फडणवीसांचा हल्लाबोल

128

मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाईबाबत बुधवारी भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुधवारी जालन्यात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पाणी प्रश्नावरून औरंगाबादनंतर जालन्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ कार चालवतात आणि देव सरकार चालवते. राज्यातील सर्व कारभार हा ईश्वर भरोसे सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस जल आक्रोश मोर्च्यात म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, भाजपच्या काळात ज्या काही योजना पाणी समस्या सोडवण्यासाठी आखल्या गेल्या होत्या, त्या गेल्या अडीच वर्षात तुसभरही पुढे सरकलेल्या नाही. भाजप सरकार सत्तेतून गेले आणि नवीन सरकारमध्ये सर्व योजना, विकास ठप्प झाल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारला फक्त एकच काम येतं ते म्हणजे चालू असलेल्या कामांना स्थगिती आणि भाजप काळातील योजनाचे उदघाटन.. हे स्वतः काही करत नाही आणि भाजपने योजलेल्या पूर्ण होऊ देत नाहीत.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींबद्दल केलेलं ‘ते’ आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं, काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल)

झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी मोर्चा

आम्ही जनतेचं सेवक असून, सामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितले. आजचा हा मोर्चा झोपलेल्या राज्य सरकारला जागं करण्यासाठी असून जनतेने तुम्हाला खुर्च्या मोडण्याकरता आणि सिंहासन मिरवण्याकरता दिलेले नाही. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवणार नसेल तर सिंहासनावर बसवण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही हेच सांगण्याकरता जल आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.