राज्यात बीए व्हेरिएंटचे चार नवे रुग्ण आढळल्याची माहिती १५ जून रोजी आरोग्य विभागाने दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. हे चारही रुग्ण १९ ते ३६ वयोगटातील महिला आहेत. नवी मुंबईत पहिल्यांदाच ओमायक्रॉनच्या बीए व्हेरिएंटची बाधा झालेला रुग्ण सापडला.
( हेही वाचा : शिवाई एसटी बससाठी पुण्यात २३ चार्जिंग स्टेशन उभारणार)
आरोग्य विभागाची माहिती
२६ मे ते ९ जून या कालावधीत या चार कोरोनाग्रस्त रुग्णांची जनुकीय चाचणी केली गेली. तीन जणांच्या जनुकीय चाचणीचा अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर एका रुग्णाच्या जनुकीय चाचणीचा अहवाल बी जे वैद्यकीय महाविद्यालयाने दिला. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले गेले. पुण्यात आतापर्यंत दहा तर मुंबई आणि ठाण्यात दोन रुग्ण बीए व्हेरिएंटचे सापडले आहेत. या व्हेरिएंटमध्ये कोरोनाची लक्षणे सौम्य स्वरुपाची तर कित्येकदा आढळूनही येत नाही आहेत. मात्र घरगुती विलगीकरणातच रुग्णांना उपचार देत बरे केले जात असल्याचे आतापर्यंतच्या निदर्शनात आढळून आले.
Join Our WhatsApp Community