भारत गौरव या योजनेअंतर्गत मंगळवारी पहिल्या खासगी रेल्वेगाडीचे उद्घाटन झाले. ही पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूर ते शिर्डी या दरम्यान धावणार आहे.
भारत गौरव योजना काय आहे?
- या योजनेअंतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्या रेल्वेकडून भाडेतत्वार गाड्या घेऊ शकणार आहेत.
- भारतीय रेल्वेकडून भाडेतत्वार घेतलेल्या या गाड्या कोणत्या मार्गावर चालवायच्या, भाडे किती आकारायचे आणि सेवा कोणच्या द्यायच्या इत्यादींचा निर्णय कंपन्या घेऊ शकतात.
- खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेगाडी भाडेतत्वावर देताना प्रवाशांची लुबाडणूक होणार नाही, याची खात्री भारतीय रेल्वेने केलेली असते.
योजना कोणाची?
- भारतीय रेल्वेचीच ही योजना आहे.
- पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.
पहिली खासगी ट्रेन
- भारत गौरव योजनेंतर्गत कोईम्बतूर ते शिर्डी ही पहिली रेल्वेगाडी धावली.
- या गाडीला 20 डब्बे जोडण्यात आले आहेत.
- प्रथम, द्वितीय आणि तृतीय इत्यादी श्रेणींचे वातानुकूलित डबे. त्याबरोबरच स्लीपर कोचचे डबे या गाडीला आहेत.
( हेही वाचा: EPFO: PF च्या नियमांत मोठा बदल, आजच करा हे काम नाहीतर होईल नुकसान )
गाडीत काय काय?
- ट्रेन कॅप्टनच्या हाती गाडीची सूत्रे असतील.
- तसेच, एक डाॅक्टर, खासगी सुरक्षा रक्षक हेही गाडीमध्ये तैनात असतील.
- प्रवाशांना शाकाहारी भोजन दिले जाईल.
- दर एक तासाने स्वच्छता कर्मचारी गाडी स्वच्छ करत जातील.