मध्य रेल्वे 140T रेल्वे क्रेन वापरून दादर स्थानकावर (किमी 8/15-16) फूट ओव्हर ब्रिज गर्डर्स लाँच करण्यासाठी माटुंगा आणि भायखळा दरम्यान रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे. 17 आणि 18 जून रोजी (शुक्रवार/शनिवार रात्री) 00.40 ते 05.40 वाजेपर्यंत माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या वळवण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – शिर्डीत धावणार पहिली खासगी ट्रेन)
ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर वळवण्यात येतील आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील.
अप मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात येतील
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणार्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर दोनदा थांबतील.
डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात येतील
डाउन ट्रेन क्रमांक 22105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवली जाईल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दादर येथे दोनदा थांबतील.
18 आणि 19 जून रोजी (शनिवार/रविवार रात्री) 00.40 ते 5.50 वाजेपर्यंत भायखळा आणि माटुंगा दरम्यान डाउन जलद मार्गावर ब्लॉक -2 घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव जन शताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोनदा थांबतील.
डाउन उपनगरीय सेवा वळवण्यात येतील
डाउन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगा दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
Join Our WhatsApp Community