ट्रेनच्या डब्यांवरील नंबरमधले हे ‘रहस्य’ जाणून घ्या, प्रवासात होईल मोठा फायदा

226

लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी आपण नेहमीच लांब पल्ल्याच्या गाड्यांना पसंती देतो. या गाड्यांमधून प्रवास करण्याची मज्जाच निराळी असते. या गाड्यांच्या प्रत्येक डब्ब्यांवर एक नंबर लिहिलेला असतो. या पाच आकडी नंबरमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. त्यामुळे प्रवास करताना तुम्हाला याची माहिती असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

प्रत्येक डब्यावर लिहिलेल्या या नंबरमध्ये तुम्हाला डब्याची जन्मतारीख आणि त्याचा क्लास अगदी सहज समजू शकतो. या पाच आकडी नंबरमधील सुरुवातीचे दोन डिजीट तुम्हाला डब्बा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला हे सांगतात, तर त्यानंतरच्या तीन डिजीटवरुन तुम्हाला डब्याचा क्लास म्हणजेच तो एसी आहे की जनरल डबा आहे हे आपल्याला ओळखता येतं.

(हेही वाचाः केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता आधार कार्डला लिंक करावे लागणार व्होटिंग कार्ड! कधीपासून होणार नियम लागू?)

उदा. समजा आता एखाद्या डब्याचा नंबर 08584 आहे, तर यामधील पहिले दोन डिजीट 08 वरुन हा डबा 2008 साली तयार करण्यात आल्याचे आपल्याला कळते. समजा एखाद्या डब्यावर 21567 नंबर लिहिला असेलस तर तो डबा 2021 मध्ये तयार करण्यात आलेला आहे.

शेवटच्या तीन डिजीटवरुन आपल्याला डब्याचा क्लास ओळखता येतो.

शेवटचे तीन डिजीट आणि डब्याचा क्लास

  • 001 to 025- AC First Class
  • 026 to 050- Composite 1AC+AC-2T
  • 051 to 100-AC-2T
  • 101 to 150-AC-3T
  • 151 to 200-CC(AC Chair Car)
  • 201 to 400-SL(2nd Class Sleeper Coach)
  • 401 to 600-GS(General Second Class)
  • 601 to 700-2S(Second Class Sitting/Jan Shatabdi Chair Class)
  • 701 to 800- Sitting Cum Luggage Rake
  • 801 आणि पुढे- Pantry Car,Generator or Mail

(हेही वाचाः आधार कार्डला कसे लिंक कराल व्होटिंग कार्ड? केंद्र सरकारचा नवा नियम)

या माहितीमुळे तुम्हाला बोगी नंबर न बघता सुद्धा डब्यांवर असलेल्या नंबरवरुन क्लास ओळखता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.