कोरोनाकाळात कायमच विघ्न आलेल्या शाळा यावर्षी सुदैवाने निर्विघ्नपणे सुरु झाल्यात पण कोल्हापुरातील आजरा या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोरची विघ्ने काही संपण्याचे नाव घेत नाहीत. आजरा येथील एका शाळेचे रुपांतर चक्क गोठ्यात झाले आणि विद्यार्थी मात्र रस्त्यावर आले. खासगी शिक्षण संस्था चालक आणि जमिनीचा मालक यांच्यामध्ये सध्या वाद सुरु आहेत आणि हा वाद इतका विकोपाला गेला की जमिन मालकाने जनावरे आणून थेट वर्गातच बांधली. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवून शिकवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. पावसामुळे उघड्यावर शिकवणे जवळपास अशक्य होणार आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.
शाळा सुरु झाल्यानंतर पाहिले तर शाळेतील बाकडे वगैरे बाहेर काढून ठेवण्यात आले होते आणि जागा मालकाने जनावरे आणून तिथे बांधली. तसेच, ही आमची जागा आहे तुम्हाला तिथे बसू देणार नाही, अशाप्रकारच्या सूचना दिल्यामुळे आम्ही वर्गातून बाहेर आलो आहोत. जमिन मालकाने शाळेला कुलूप लावले आहे. त्यामुळे जागा देणारे आणि जागा घेणारे यांच्याशी वाद न घालता आम्ही थेट वर्ग बाहेर घ्यायला सुरुवात केल्याचे असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community