देयक पद्धती माहिती साठवणुकीबाबत नियमांच्या उल्लंघनाच्या प्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने मास्टरकार्ड वर नवीन ग्राहक जोडण्यास घातलेले निर्बंध गुरुवारी मागे घेतले. रिझर्व्ह बॅंकेने गेल्या वर्षी 22 जुलैला मास्टरकार्डवर निर्बंध लादताना, नवीन क्रेडिट, डेबिट तसेच प्रीपेड कार्ड भारतात वितरित करण्यास मनाईचे आदेश दिला होता.
रिझर्व्ह बॅंकेच्या 6 एप्रिल 2018 ला जाहीर केलेल्या देयक पद्धती माहिती साठवणुकीच्या नियमांचे पालन न झाल्याचा ठपका मास्टरकार्ड वर ठेवण्यात आला होता. देयक पद्धती माहिती साठवणुकीबाबत भारतातील घडामोडींची पूर्तता सहा महिन्यांत करण्याचे मास्टरकार्डला रिझर्व्ह बॅंकेने आदेश दिले होते. मास्टरकार्ड ही अशा प्रकारची कारवाई झालेली तिसरी आंतरराष्ट्रीय वित्त कंपनी आहे.
( हेही वाचा: व्हायरल होणा-या व्हिडीओमागे राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्याचा हात; सदाभाऊ खोत यांचा आरोप )
Join Our WhatsApp Community