केंद्र सरकार नोकरदार कर्मचा-यांसाठी नवीन कामगार कायदे लागू करण्याच्या तयारीत आहेत. हे कायदे 1 जुलैपासून लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे कामगारांच्या सुट्ट्यांपासून अनेक नियमांत बदल होण्याची शक्यता आहे.
नव्याने लागू करण्यात येणा-या या कामगार कायद्यांमध्ये वेतन, पेन्शन, ग्रॅच्युईटी, कामगार कल्याण, आरोग्य, सुरक्षितता आणि कामाच्या परिस्थिती (महिलांसह) यांच्याशी संबंधित सुधारणा करण्यात येणार आहेत. पण यामुळे पगार कमी होणार असून, पीएफच्या रक्कमेत वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा: EPFO: PF चे व्याज अकाऊंटला जमा झाले की नाही? असा चेक करा बॅलेन्स)
काय होऊ शकतात बदल?
यामुळे कर्मचा-यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण कर्मचा-यांच्या भविष्यासाठीची जमापुंजी असलेल्या पीएफच्या रक्कमेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचा-यांना त्यांच्या निवृत्तीनंतर मिळणा-या पीएफ आणि ग्रॅच्युटीमध्ये वाढ होणार आहे. तसेच कंपन्यांकडून पीएफसाठी देण्यात येणारे योगदानही वाढणार आहे.
(हेही वाचाः आठवड्यातून रविवार येतील ना हो तिनदा, ऑफिसच्या सुट्ट्यांबाबत केंद्र सरकार नवे कायदे लागू करण्याच्या तयारीत)
चार दिवसांचा आठवडा
हे कायदे लागू झाल्यास कर्मचा-यांना आठवड्यातून चार दिवस काम करुन तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. मात्र चार दिवसांत त्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हे चार दिवस त्यांच्या कामाच्या वेळा 8 ते 9 तासांवरुन 12 तासांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. मात्र, आठवड्यातील एकूण कामकाजाच्या तासांमध्ये बदल न करण्याचा विचार आहे.
Join Our WhatsApp Community