गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील किनारपट्टीवर विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी येणा-या मादी ऑलिव्ह रिडले कासवांच्या स्वभावातील निराळाच पैलू शास्त्रज्ञ डॉ आर राकेशकुमार यांनी उलगडवून दाखवला. पाचपैकी सॅटलाईट टॅगिंग केलेल्या तिन्ही कासवांनी आपल्या समुद्रभ्रमंतीच्या काळात खोल समुद्रात जाणे टाळले असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. अरबी समुद्रातील खोल समुद्रात खायला मिळत नसल्याने किनारपट्टीजवळ वास्तव्य करण्यास या कासवांनी पसंती दिली आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के सुयश)
मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळताच ऑलिव्ह रिडले कासवांनी किनारपट्टी जवळच वास्तव्य केले. अरबी समुद्रातील विशिष्ठ भागांत अन्नाची तसेच पुरेशा ऑक्सिजनची सुविधा नसल्याची पूर्वकल्पना असल्याने या कासवांनी खोल समुद्रात जाणे टाळले अशी माहिती डॉ आर सुरेशकुमार यांनी दिली. मात्र रेवा या मादी ऑलिव्ह रिडले कासवाने ३२० मीटर खोल समुद्राची भ्रमंती करत पुन्हा किना-यालगतचा समुद्र गाठला.
समुद्रातील कासवांकडून सिग्नल मिळतो कसा ?
‘अँटिनावाले कासव ‘ या लघुपटाच्या प्रदर्शनावेळी कासवांना समुद्रातील मार्ग शोधताना यंत्रणा कशी कामाला येते, याची रंजक माहिती भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ आर राकेशकुमार यांनी दिली. समुद्रात भ्रमंती करणारे कासव श्वास घ्यायला मात्र बाहेर येतात. त्यावेळी त्यांच्या पाठीवर सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून बसवलेल्या ट्रान्समीटरच्या माध्यमातून सिग्नल मिळतो.
कुठे आहेत मादी ऑलिव्ह रिडले कासव
वनश्रीकडून दक्षिण कोकणाचा समुद्र काही केल्या सुटेना, तिला तिथल्या समुद्रातच राहायला सुरुवातीपासून आवडते आहे. रेवा आणि सावनी आता कर्नाटक राज्यातील समुद्रात जवळ आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community