EPFO: पेन्शन मिळवायचंय…ई-नॉमिनेशन अनिवार्य! कसे करणार? जाणून घ्या

147

जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेधारक म्हणजेच पेन्शन धारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्हाला पेन्शन मिळवायचंय तर आजिबात चिंता करू नका कारण आता पेन्शन मिळवणे सोपे झाले आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला ई-नॉमिनेशन करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही ई-नॉमिनेशन केले नाही तर विमा किंवा पेन्शनचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

(हेही वाचा – 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुसऱ्यांदा वाढ होणार!)

समजा खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्यांना कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येतात. या अडचणी लक्षात घेता ई-नॉमिनेशन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पीएफ खातेदारांनी ई-नॉमिनेशन भरल्यास विमा, निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ उपलब्ध होईल, शिवाय ई- नॉमिनेशन केल्यास ना हरकत प्रमाणपत्राची (NOC) आवश्यकता भासणार नाही. जर कर्मचारी विवाहित असेल, तर त्याच्या पत्नीचे आधार मतदार कार्ड, फोटोसह ई-नॉमिनेशन दाखल करावे लागेल. या सुविधेअंतर्गत नॉमिनीचे नाव ऑनलाईन माध्यमातून सहज नोंदवणं आता शक्य आहे.

ऑनलाइनही करता येणार पेन्शनचा अर्ज

ई-नॉमिनेशन केल्यास निवृत्तीनंतर खातेधारकांना पेन्शनचा लाभ घेण्यात अडचणी येत नाहीत. शिवाय ई-नॉमिनेशन प्रक्रिया झालेली असल्यास पेन्शनचा अर्जही ऑनलाइन दाखल करता येतो. त्यासाठी कागदपत्रे व इतर कामासाठी कचेरीत फेऱ्या मारायची आवश्यकता भासत नाही.

असे करा ई – नॉमिनेशन

  • ईपीएफओ पोर्टलवरील फॉर एम्प्लॉइज’ पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर यूएएन किवा ऑनलाइन सेवावर क्लिक करा. फोटो आणि इतर माहिती अपडेट करण्यासाठी प्रोफाइलवर क्लिक करा.
  • मॅनेज पर्यायावर जाऊन ई-नॉमिनेशन निवडा आणि फॅमिली डिक्लेरेशनवर होय किवा नाही वर क्लिक करा.
  • त्यानंतर अॅड फॅमिली डिटेल्सवर क्लिक करा आणि इतर तपशील आणि फोटोसह संबंधितांचा आधार क्रमांक जोडा.
  • संपूर्ण कुटुंबाचे तपशील अपडेट केल्यानंतर सेव्ह फॅमिली डिटेल्स हा पर्याय निवडा.
  • सेव्ह ई-नॉमिनेशनवर क्लिक करा आणि सदस्याचा आधार क्रमांक टाकून यूआयडीएआय वेबसाइटवरून व्हर्चुअल आयडी तयार करा. ज्याचा एक एसएमएस मिळेल.
  • सदस्य पोर्टलवर ई-साइन वर क्लिक करा आणि आधारवरून व्हर्चुअल आयडी टाकून जनरेट ओटीपीवर क्लिक करा.
  • आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर सहा अफी ओटीपी येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर ई-नॉमिनेशन पूर्ण होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.