मत बाद झाले, तर याद राखा! शिवसेनेने आमदारांना दिला दम

171

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद झाले त्याचा फटका शिवसेनेला बसला, विशेष म्हणजे संजय राऊत अगदी काटावरच्या मतांनी निवडून आले, अन्यथा तेही पराभूत झाले असते त्यामुळे आता शिवसेना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सतर्क झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने थेट आमदारांना दमच भरला आहे. मत बाद झाले तर याद राखा, कारवाई करू, असा इशारा दिला आहे.

शिवसेना आमदारांची पवईच्या वेस्ट इन हॉटेलवर राहण्याची व्यवस्था

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्व आमदारांची मतदानाची थेट रंगीत तालीमच घेतली. या रंगीत तालमीत सर्व आमदारांना प्रत्यक्ष मतदान कसे करावे, याचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. मतदान करताना कोणत्या चुका टाळाव्यात याचे प्रात्याक्षिक दिले गेले. यावेळी डमी मतपेटी देखील होती. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची पवईच्या वेस्ट इन हॉटेलवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या दरम्यान या सर्व आमदारांची शनिवारी वेस्ट इन हॉटेलवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदारदेखील उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत आमदारांना विधान परीषद निवडणुकीत मतदान कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले. प्रत्यक्ष मतदानावेळी जशी मतदान प्रक्रिया असते तसी रंगीत तालीम करणारे प्रत्यक्षिक सर्व आमदारांकडून करून घेण्यात आले. या बैठकीला प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू हेदेखील उपस्थित होते. शिवसेनेच्या रंगीत तालमीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मतदान कसे करावे, याची तपासणी होती. प्रत्येकाला मत टाकायला लावले. मोजणी सुरु केली. कुणाचे मत चुकले, काय चुकले ते तपासले गेले. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत वाया गेले. त्यासाठीच आता काळजी घेतली जात आहे. एक चुकले म्हणून अजून कुणी जास्त चुकू नये. यासाठी सर्व काही सुरु आहे,  असे बच्चू कडू यांनी सांगितले.

(हेही वाचा shivsena anniversary 2022 : शिवसैनिक प्रवाहातील आणि प्रवाहाबाहेरील!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.