स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि छबिलदास इंग्रजी माध्यम सीबीएसई शाळा यांचा ऑलिंपिक क्रीडा उपक्रम सुरू

202

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई आणि जीईआय छबिलदास इंग्रजी माध्यम सीबीएसई शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला ऑलिंपिक क्रीडा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग, फेन्सिंग, आर्चरी तसेच निवडक मुलांना रायफल शुटिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या उपक्रमानुसार सावरकर स्मारकातील काही उपक्रमांचा फायदा शाळेने आपल्या मुलांना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सुमारे ४० पेक्षा अधिक मुलांना या योजनेमुळे क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांचा फायदा मिळणार आहे. याद्वारे सावरकर स्मारकात चालविण्या जाणाऱ्या तलवारबाजी (फेन्सिंग), मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग), तिरंदाजी (आर्चरी) आणि नेमबाजी म्हणजेच शूटिंग या क्रीडा प्रकारातील प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

New Project 10 4

‘हारते हारते, जितना सिखोगे’

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, तुम्ही दहावी -बारावीच्या परीक्षांमध्ये नापास झालात तर तुमचे वर्ष वाया जाते. परंतु खेळात असे नसते ‘हारते हारते, जितना सिखोगे’ खेळ तुम्हाला प्रत्येक दिवशी शिकवत असतो. खेळांमुळे तुमची एकाग्रता, आकलन क्षमता वाढते. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये तुम्ही खेळांच्या अतिरिक्त गुणांमुळे जास्त टक्के मिळवू शकता. आमच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्येसुद्धा आम्ही मुलांना विविध खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. तुम्हीही विविध खेळांमध्ये सहभागी व्हा असे त्यांना मार्गदर्शन करतो असेही त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के सुयश)

या कार्यक्रमात सुरुवातीला या योजनेची माहिती करून देण्यात आली तसेच वीर सावरकर स्मारकातील विविध उपक्रमांची माहिती देणारी ध्वनिचित्रफितही दाखविण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना अहिरे यांनी प्रास्ताविक भाषण केले तसेच शाळेशी संबंधित संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री पार्सेकर, इनामदार आणि साळवी यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी जीईआय संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी क्रीडाविषयक चार प्रकारांचे प्रात्यक्षिकही सादर केले गेले. तसेच तिरंदाजीचे मार्गदर्शक प्रशिक्षक स्वप्निल परब यांनीही उपस्थित मुले आणि पालकांच्या शंकांचे निरसन केले.

New Project 9 7

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.