सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची धुमाकूळ सुरु आहे, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांनी त्यांच्या त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवले आहे. आमदारांना फोडता येऊ नये, म्हणून प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करत आहेत, एकेक आमदाराचे मत महत्वाचे असताना आता भाजपचे कट्टर समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अटक वॉरंट जारी केला आहे. विधान परिषद निवडणुकीतील हे कटकारस्थान आहे का, असा तर्कवितर्क लढवण्यात येत आहे.
अमरावतीतील शाई फेक प्रकरण
अमरावती महापालिका आयुक्तांवर शाई फेकण्याच्या प्रकरणात न्यायालयात हजर राहण्यासाठी स्थानिक न्यायालयाने वारंवार आमदार रवी राणा यांना नोटीस पाठवली आहे, मात्र आमदार रवी राणा हे उपस्थित राहत नाही, म्हणून अखेर न्यायालयाच्या आदेशावरून अमरावती पोलिसांनी मुंबई पोलिसांना रवी राणा यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याची विनंती केली, त्यानुसार मुंबई पोलीस शनिवार, १८ जून रोजी रवी राणा यांच्या मुंबईतील घराकडे टक वॉरंट घेऊन गेले मात्र तिकडे वॉरंट घेण्यासाठी कोणीही नव्हते. अमरावतीला राजापेठ पोलीस ठाण्याने आमदार राणा यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकारणी कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पुढे सरसावले आहेत.
(हेही वाचा shivsena anniversary 2022 : शिवसैनिक प्रवाहातील आणि प्रवाहाबाहेरील!)
भाजपचे मत कमी करण्याचे कारस्थान
विधान परिषदेची निवडणूक दोन दिवसावर आली असताना रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट काढणे हा योगायोग नाही. राणा यांना अटक करून भाजपचे एक मत कमी करण्याचे कारस्थान आहे का, अशी चर्चा सुरु आहे, कारण एनसीपीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानासाठी परवानगी दिली नाही, त्यामुळे एनसीपीची २ मते कमी झाली आहेत, आता हाच कट महाविकास आघाडी सरकार रचत आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community