राज्यातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ८८३ वर नोंदवली गेली. आता राज्यात तब्बल २२ हजार ८२८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत दोन कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले.
शनिवारी उपचार होऊ बरे झालेल्या रुग्णांमध्ये २ हजार ८०२ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८५ टक्क्यांवर नोंदवले गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दररोजच्या मृत रुग्णांच्या नोंदीमुळे आता राज्यातील मृत्यूदरही १.८६ टक्क्यांवर घसरला. ही घसरण किंचित असली तरीही वाढती रुग्णसंख्या आरोग्य विभागासमोर आव्हान ठरले आहे.
शनिवारी फक्त मुंबईत २ हजार ५४ कोरोना रुग्ण सापडले. ठाणे शहरात ३१८, नवी मुंबईत ३०८, कल्याण-डोंबिवलीत १२२, पनवेलमध्ये ११८, वसई-विरारमध्ये १०२, रायगडमध्ये १०० नवे रुग्ण सापडले. पुण्यातही १८८ नव्या रुग्णांची भर पडली. आता राज्यात १३ हजार ६१३ रुग्ण केवळ मुंबईत उपचार घेत आहेत. ठाण्यात ४ हजार ८६९, पुण्यात १ हजार ७२२ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार दिले जात आहेत.
Join Our WhatsApp Community