भिवडींत सडक्या फळांचा रस विकणा-याचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला आहे. यानिमीत्ताने शहरातील नागरिकांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशानसनासह भिवंडी महापालिका प्रशासनाकडून रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने, संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांनी दिला चोप
भिवंडीतील साईबाबा मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंतीगृहाचा चालक सडलेल्या फळांचा रस ग्राहकांचा विकत असल्याचा व्हिडीओ एका दक्ष नागरिकाने बनवून तो समाजमाध्यमावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होऊनही या विक्रेत्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अशोकनगर येथे असलेल्या ज्यूस सेंटरच्या मुख्य मालकाला स्थानिकांनी धारेवर धरुन चांगलाच चोप दिला.
( हेही वाचा: 1 जुलैपासून बंदी घातलेल्या सिंगल वापराच्या प्लॅस्टिक वस्तूंची यादी जाहीर )
Join Our WhatsApp Community