कोरोना रुग्णसंख्येचा रविवारी नवा विक्रम, वाचा आकडेवारी

132

रविवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ४ हजार ४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २ हजार ८७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले असून, ठाण्यात ३७५, नवी मुंबईत ३३० पुण्यात २२९ नव्या कोरोना रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आता विविध भागांत २३ हजार ७४६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

असा आहे रुग्ण बरे होण्याचा दर

४ हजार ४ नवे रुग्ण आढळले असले तरीही गेल्या २४ तासांत ३ हजार ८५ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे राज्य पातळीवरील प्रमाण आता ९७.८४ टक्क्यांवर नोंदवले जात आहे. रविवारी मुंबईत उपचारादरम्यान एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण तपासणीअंती कोरोनाबाधित असण्याचे प्रमाण ९.७२ टक्क्यांवर कायम आहे.

(हेही वाचाः कोरोनाने महिलांपेक्षा जास्त पुरुषांचा घेतला बळी, कारणं वाचून थक्क व्हाल)

अशी आहे जिल्ह्यांतील परिस्थिती

मुंबईत आता १३ हजार ८९७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाण्यात ५ हजार १७४, पालघरमध्ये ७५२ तर रायगडमधील कोरोना रुग्णांचा आकडा आता ९५५ पर्यंत पोहोचला आहे. पुण्यातही १ हजार ८१२ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत. नागपूरात ३१९, नाशिक जिल्ह्यात १३९ कोरोना रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.