विधानपरिषदेत मतदान करण्यासाठी आमदार रवी राणा हे विधानभवनात दाखल झाले आहेत. हनुमान चालीसा हातात घेऊन रवी राणा विधानसभेत दाखल झाले. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर दबाव टाकण्याचा मविआकडून प्रयत्न सुरु असल्याचे, रवी राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. पोलिसांचा वापर करुन मला कधीही अटक केली जाऊ शकते, असेही रवी राणा यावेळी म्हणाले.
म्हणून माझ्यावर दबाव टाकला जातोय
मागच्या दोन दिवसांपासून अमरावतीच्या सीपीने अटक वाॅरंट पाठवून, माझ्या मुंबईच्या घरी पोलीस पाठवले. मुंबई सीपीने त्यांना सहकार्य केले आणि मुंबईचे पोलीस गाडी घेऊन मला ताब्यात घ्यायला आले. याचा अर्थ असा की या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी माझ्यावर मविआकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाविकास आघाडीला मतदान किंवा शिवसेनेला मतदान केले पाहिजे यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असे राणा यांनी पत्रकारांना सांगितले.
( हेही वाचा: दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादीची सावध भूमिका; उमेदवारांच्या मतांचा कोटा वाढवला )
जनता तुम्हाला पायाशी घेईल
संजय राऊत रविवारी बोलले की रवी राणा आमच्या पायाशी येईल. एक लक्षात ठेवा ज्या जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून दिले. 56 वर्षांनंतर पहिल्यांदा तुम्ही या जनेतशी दगाबाजी केली आहे. तुम्हाला जनता पायाशी घेईल. हे लक्षात ठेवा, असे म्हणत रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.