राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यात अनेक भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. सोमवारी विधान परिषदेचे मतदान सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीने आपल्या ५ महत्त्वाच्या नेत्यांची मते मागे ठेवल्याची माहिती मिळतेय. तर भाजप नेते आणि फडणवीस काळातील महत्त्वाचे मंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावारांच्या भेटीला गेले आहे. हे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असून त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचा – “मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार!” भाजपच्या अनिल बोंडेंना वाटणारे ‘ते’ मिशीवाले कोण?)
भेटी मागचे कारण अद्याप अस्पष्ट
राज्यसभेतील झालेल्या दगाफटका विधान परिषदेला होऊ नये म्हणून महा विकास आघाडीकडून सावधतेचा पवित्रा घेण्यात आला आहे. तर ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीची असल्याने एका उमेदवाराला किती आमदारांनी मत द्यायचे हे मुख्यमंत्री शेवटच्या क्षणाला ठरवणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. यामुळे बावनकुळे हे नेमके अजित पवारांना भेटायला कोणत्या कारणाने गेलेत, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तर अजित पवार, एकनाथ खडसे आणि बावनकुळे यांच्यात चर्चा सुरू असल्याचे समजतेय.
…यामुळे आमदारच त्याचा बदला घेणार
दरम्यान, आमचेच उमेदवार जिंकतील असे सांगत बावनकुळे यांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वांसाठी उपलब्ध असायचे. आताचे मुख्यमंत्री कुठे असतात, कोणाला भेटतात. यामुळे आमदारच त्याचा बदला घेतील, असे बावनकुळेंनी सांगितले. मात्र, बावनकुळेंनी अजित पवारांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावेळी ही भेट वैयक्तिक कामासाठी असल्याचे बावनकुळे म्हणाले. तर मतदारसंघातील कामांसाठी अजित दादांची भेट घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितलं.