देशातील पाच उच्च न्यायालयांना मुख्य न्यायाधीश मिळाले आहेत. त्यात उत्तराखंड, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुवाहाटी आणि दिल्ली उच्च न्यायालयांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संभाजी शिवाजी शिंदे यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायमूर्तीचे नाव उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
- न्यायमूर्ती संभाजी शिवाजी शिंदे राजस्थान
- न्यायमूर्ती विपिन संघी उत्तराखंड
- न्यायमूर्ती उज्जल भुयान तेलंगाना
- न्यायमूर्ती अमजद एहतेशाम सय्यद हिमाचल प्रदेश
- न्यायमूर्ती रश्मी मनहरभाई छाया गुवाहाटी
- न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा दिल्ली
(हेही वाचा मतदान संपले आता निकालाची प्रतीक्षा! चमत्कार घडणार की आकडे जिंकणार?)
मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींची मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामध्ये न्यायमूर्ती संभाजी शिवाजी शिंदे यांना राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनवण्यात आले आहे, त्याचप्रमाणे न्यायमूर्ती अमजद एहतेशाम सय्यद यांना हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती बनवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community