प्रसाद लाड ‘सेफ’, कोणाला बसणार ‘धक्का’?

131

विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणीला विलंब होत असतानाच आता मतांच्या कोट्याबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. भाजपने विधान परिषदेतील आपले पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांचे पाचवे स्थान बदलले असून त्यांना चौथ्या स्थानावर प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या चौथ्या क्रमांकाच्या उमेदवार उमा खापरे यांना धक्का बसण्याची शक्यता सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपची रणनीती

भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांचा प्राधान्यक्रम शेवटच्या क्षणी बदलून त्यांना चौथ्या क्रमांकावर प्राधान्य देण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. त्यामुळे चौथ्या जागी असलेल्या उमा खापरे यांना पाचव्या स्थानावर जागा मिळाली असून, त्यांना या निवडणुकीत अपेक्षित मतांचा कोटा मिळाला नाही तर त्यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः मोजणीआधीच काँग्रेसला दणका, असंवेदनशीलतेवर चौफेर टीका)

खडसेंची भिस्त अपक्षांवर

दुसरीकडे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी न मिळाल्यामुळे दोन मतं कमी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या पसंतीची मतं ही राजराजे निंबाळकर यांना देण्याचे ठरवण्यात आले असून, दुस-या पसंतीची मतं एकनाथ खडसे यांना मिळणार आहेत. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांची भिस्त अपक्षांच्या मतांवर अवलंबून असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.