संपूर्ण जगभरात 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आध्यात्मिक आणि शारिरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरुकता करणे हा या योग दिवसामागचा उद्देश आहे. तसेच, यंदाची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊया.
PIB India ने योग डे निमित्त केले ट्वीट
PM @narendramodi to participate in #Yoga programme on occasion of 8th #InternationalDayofYoga tomorrow
📍Mysore Palace ground, Karnataka
PM @narendramodi to participate in #Yoga programme on occasion of 8th #InternationalDayofYoga tomorrow
📍Mysore Palace ground, Karnataka#IYD2022 pic.twitter.com/gzXMQoKAsE
— PIB India (@PIB_India) June 20, 2022
योग फाॅर ह्युमॅनिटी 2022 ची थीम
संपूर्ण जगासाठी 2022 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘मानवतेसाठी योग’ आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेऊन या योग दिनाची ‘योग फाॅर ह्युमॅनिटी’ (YOGA FOR HUMANITY) ही थीम निवडण्यात आली आहे.
( हेही वाचा: Google map new feature: ‘गुगल मॅप’ वर असे पिन करा लोकेशन आणि सहज पोहचा)
योग दिनाचा इतिहास
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात भाषण देताना दिला होता. तो बहुमताने 11 डिसेंबर 2014 रोजी स्वीकरण्यात आला आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 2015 रोजी योग दिनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.
Join Our WhatsApp Community