भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी पैगंबर प्रेषितांविषयी केलेल्या तथाकथित अवमानकारक वक्तव्याचा देशभरात मुस्लिम तरुणांमध्ये धर्मांधता वाढवण्यासाठी वापर होत आहे. मुस्लिम तरुणांची उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र येथे मोर्चे, निदर्शने, हिंसक आंदोलने सुरू आहेत. देशभरात अशांतता निर्माण करण्यासाठी नुपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे भांडवल केले जात आहे. नुपुर शर्माचा शिरच्छेद करण्याची मागणी करत आहेत, बलात्काराची धमकी देत आहेत. त्या नुपुर यांना पाकिस्तानात समर्थन मिळत आहे, भारतात मात्र नुपुर यांच्या समर्थनाबाबत हिंदू निद्रिस्त आहेत.
पाकिस्तानातील मौलाना इंजिनियर महंमद अली यांनी नुपुर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. ज्या चर्चासत्रात नुपुर शर्मा यांना चिथावणीखोर वक्तव्य करण्यास भाग पाडले, तो तसलिम अहमद रेहमानी हा पहिला आरोपी आहे. त्याने आधी हिंदू धर्माविषयी चुकीचे विधान केले. कोणत्याही धर्माचा अवमान करणे, कुराणानुसार अयोग्य आहे. अरब देशातील लोक घरात वातानुकूलीत वातावरणात बसून बाहेरील वातावरण बिघडवत आहेत, असे मत मौलाना इंजिनियर महंमद अली यांनी मांडले.
(हेही वाचा ‘इन्क्विझिशन’च्या अत्याचारांची माहिती देण्यासाठी लवकरच ‘गोवा फाईल्स’!)
नुपुर यांना भारतातील मुस्लिम विचारवंतांकडूनही समर्थन
तर ज्येष्ठ साहित्यिक आणि राष्ट्रीय व्याख्यान- प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले की, नुपुर शर्माच्या नावाखाली आज देशभरातील मुस्लिम तरुणांची हकनाक माथी भडकावली जात आहेत. नुपुर शर्माच्या वक्तव्यावर पत्रकार रुबिका लियाकत किंवा मुस्लिम अभ्यासक डॉ. रिझवान यांनी काही मते मांडली आहेत, त्यांचाही विचार झाला पाहिजे. कारण ही मंडळी प्रेषित पैगंबरांविषयी नुपुर यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने मत प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे इथे मुस्लिम धर्म अभ्यासकही जर तसे मतप्रदर्शन करत असतील, तर त्यावर साधक-बाधक चर्चा होण्यास हरकत नाही.
नुपुरचे वक्तव्य उत्स्फूर्त नाही
नुपुर शर्माने टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात प्रेषित पैगंबरांबाबत वक्तव्य केले, ते वक्तव्य उत्स्फूर्त नव्हते, त्यासाठी खरेतर तिला प्रवृत्त करण्यात आले. कारण त्या चर्चासत्रात तसलिम अहमद रेहमानी याने ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाविषयी अतिशय अश्लाघ्य उल्लेख करून नुपूरला भडकावले होते. त्यामुळे ‘जर तुम्ही शिवलिंगाविषयी अशी मते मांडता, तर आम्हीही त्यासारखी मते मांडू शकत नाही का’, अशी भावना ते वक्तव्य करण्यामागे नुपूरची होती. अर्थात म्हणून नुपुरच्या वक्तव्याचे समर्थन करता येत नाही. मात्र त्यानंतर तथाकथित फॅक्टचेकर झुबेर याने नुपुरची ती मुलाखत तोडूनमोडून प्रसारीत केली, त्याने भारतातील मुस्लिम तरुणांची माथी भडकली, असेही डॉ. शेवडे म्हणाले.
Join Our WhatsApp Community