BMC election 2022 : डोंगरी, पायधुणीत महिला महिलाच

162

पायधुणी, मस्जिद, ठाकूरद्वार,चंदनवाडी या महापालिकेच्या बी आणि सी विभागात मागील निवडणुकीत दोन प्रभाग खुले आणि दोन प्रभाग ओबीसी महिला तसेच एक प्रभाग महिला राखीव होता. परंतु आगामी निवडणुकीत हे पाचही प्रभाग महिला राखीव झाल्याने या दोन्ही विभागांमध्ये महिलाराजच दिसून येणार आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांनो, पाणी कपातीला व्हा तयार, तलाव साठा केवळ १० टक्केच!)

या प्रभागात भाजपच्या रिटा मकवाना, काँग्रेसच्या निकिता ज्ञानराज निकम आण आफरिन शेख यांचे प्रभाग महिला आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही नगरसेविकांचा पुन्हा महापालिकेत परतण्याचा मार्ग खुला झाला आहे. तर भाजपचे अतुल शाह आणि आकाश पुरोहित यांचे प्रभागही महिला आरक्षित झालें आहे. शाह हे केवळ ईश्वर चिठीवर निवडून आले होते, शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आणि शाह यांना समसमान मते मिळाली होती. परंतु ईश्वर चिठीत शाह हे सरस ठरले होते.

विभाग : बी आणि सी विभाग (डोंगरी, ठाकूरद्वार, पायधूणी, मस्जिद,चंदनवाडी)

प्रभाग २२०, खुला प्रवर्ग (अतुल शाह, भाजप ) नवीन प्रभाग २२९, आरक्षण (महिला)
नवीन प्रभाग रचना : दुर्गादेवी उद्यानपासून भेंडीबाजार येथील ब्रिगेडियर उस्मान मार्गापर्यंत, कामाठीपुरा, नळबाजार, गुलालवाडी, कुंभारतुकडा, मौलाना शौकत अली रोडपर्यंत

प्रभाग २२१, खुला प्रवर्ग (आकाश पुराहित, भाजप ) नवीन प्रभाग २३०, आरक्षण (महिला)
नवीन प्रभाग रचना : फणसवाडी येथे सियाराम पोद्दार मार्ग व ठाकूरद्वारे मार्गे, भुलेश्वरपर्यं, विठ्ठलवाडी, झवेरीबाजार, फणसवाडी, भूलेश्वर, लोहारचाळ, डॉ बाबासाहेब जयकर मार्गापर्यंत

प्रभाग २२२, ओबीसी महिला प्रवर्ग (रिटा मकवाना, भाजप ) नवीन प्रभाग २३१, आरक्षण (महिला)
नवीन प्रभाग रचना : धोबी तलाव, सोनापूर,चंदनवाडी, जिमखाना, ठाकूरद्वार, चेऊलवाडी

प्रभाग २२३, महिला प्रवर्ग (निकिता निकम, काँग्रेस) नवीन प्रभाग २३२, आरक्षण (महिला)
नवीन प्रभाग रचना : उमरखाडी, दानाबंदर, प्रिन्सेस डॉक्स, वाडीबंदर,अब्दुल रेहमान स्ट्रिट

प्रभाग २२४, ओबीसी महिला प्रवर्ग (आफरिन शेख, भाजप ) नवीन प्रभाग २३३, आरक्षण (महिला)
नवीन प्रभाग रचना :व्हिक्टोरिया डॉक्स, बंगालीपुरा, कोळीवाडा,मांडवी, पायधूनी, लोकमान्य टिळक मार्ग व कर्नाक रोड, न्यू डॉक रोड

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.