राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवून आणला. मात्र या निवडणुकीतून महाविकास आघाडीतील आमदारांचा असंतोष समोर आला आहे, असे मत फडणवीस म्हणाले होते, या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी भाजपने विधान परिषद निवडणुकीत पाचवा उमेदवार उभा केला, त्यात भाजप पाचवा उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले. या निवडणुकीत पहिल्या फेरीतील १३४ मते भाजपाला मिळाल्याने भाजपाकडे विधानसभेतील एकूण २८८ पैकी १३४ चे मताधिक्य आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाला अवघ्या १० आमदारांची गरज आहे.
आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लक्ष!
भाजपाकडे सध्या स्वतःचे १०६ आमदार आहेत, तसेच अपक्ष आणि छोटे पक्ष यांचा पाठिंबा मिळून ती संख्या ११६ होती, मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे चारही आमदार १३४ मतांनी पहिल्या फेरीत निवडून आले. याचा अर्थ भाजपाला १७ अन्य आमदारांनी पाठिंबा दिला आहेत. ही मते अपक्ष, बविआच्या ३ मतांसह काँग्रेस, शिवसेना यांची मते फुटली आणि ती भाजपच्या पारड्यात पडली. यावरून भाजपचे विधानसभेत १३४चे मताधिक्य निर्माण झाले आहे. यावरून उद्या जर विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लागली आणि गुप्त मतदान झाले तर भाजपचा विधानसभा अध्यक्ष निवडून येऊ शकतो पर्यायाने भाजपचे सरकार पुन्हा येईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपच्या प्रसाद लाड यांना १७, प्रवीण दरेकर यांना २९, श्रीकांत भारती यांना ३०, राम शिंदे यांना ३० तर उमा खापरे यांना २८ मते मिळाली आहेत, यावरून भाजपाचे विधानसभेतील मताधिक्य १३४ झाले आहे.
Join Our WhatsApp Community