मुंबई विद्यापीठाचा अपवाद वगळता राज्यातील बहुतांश विद्यापीठांतील पदवीच्या परीक्षा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. या परीक्षा जुलैपर्यंत चालणार असून, त्याचा निकाल ऑगस्ट अथवा सप्टेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातून परदेशात शिक्षणासाठी जाणारे हजारो विद्यार्थी परदेशातील शिक्षणाला मुकणार आहेत.
पदवी परीक्षेस विलंब होत असून, त्यामुळे निकालही उशिरा लागणार आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष कोलमडणार असल्याची भीती शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. परिणामी, राज्यातील एका विद्यापीठातून दुस-या विद्यापीठात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनाही लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर उच्च शिक्षण विभागाने योग्य मार्ग काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
मुंबई विद्यापीठ आघाडीवर
पदवी अभ्यासक्रमाच्या बहुतांश परीक्षा आणि निकाल जाहीर करण्यात मुंबई विद्यापीठाने राज्यात आघाडी घेतली आहे. पदवीच्या बुहतेक सर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, लवकरच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यापीठाकडून कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परदेशात शिक्षणाला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
( हेही वाचा: शिवसेनेकडे उरले आता अवघे १८ आमदार )
तोडगा काढला जाईल
एप्रिल महिन्यात कुलगुरुंशी झालेल्या बैठकीत 1 जून ते 15 जुलैपासून विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यासंर्भात निर्णय झाला होता. बहुतांश कुलगुरुंनी त्याला संमती दर्शवली होती. तरीही परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्यास, त्यावर उच्च शिक्षण विभागाकडून तोडगा काढला जाईल, अशी माहिती उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सुत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community