‘तेल लावून आले होते, पण खेळ बुद्धिबळाचा होता’, भाजपची शिवसेनेवर बोचरी टीका

126

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवानंतर आता सरकारमध्ये एक‘मत’ नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असतानाच भाजपकडून महाविकास आघाडीच्या पराभवावर बोचरी टीका करण्यात येत आहे.

विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ कमी असून सुद्धा भाजपने आपले सर्व उमेदवार निवडून आणले. त्यामुळे यावरुन आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. पहिलवान तेल लावून आले होते पण खेळ बुद्धिबळाचा निघाला, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

(हेही वाचाः 48 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची एकनाथ शिंदे पुनरावृत्ती करणार? शिंदेंच्या ट्वीटमुळे खळबळ)

महाविकास आघाडीवर मात

विधान परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने पुन्हा एकदा चमत्कार घडवून आणला. भाजपने आपले पाचही आमदार निवडून आणत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धूळ चारली. या निवडणुकीत भाजपच्या आमदारांचे संख्याबळ कमी होते, त्यामुळे ही निवडणूक जिंकणे हे भाजपसाठी अशक्य मानले जात होते. पण पुन्हा एकदा भाजपने अंकांचे गणित जुळवून आणत महाविकास आघाडीवर मात केली.

(हेही वाचाः असंतोषामुळे काँग्रेसही फुटीच्या उंबरठ्यावर? ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची खदखद)

आखाड्याचा नाही, आकड्यांचा खेळ

राज्यसभेनंतर या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अपक्षांसह 113 आमदारांचं पाठबळ असलेल्या भाजपला या निवडणुकीत पहिल्या पसंतीची तब्बल 133 मतं मिळाली. त्यामुळे हा आखाड्याचा नाही तर आकड्यांचा खेळ होता, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.