१ जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होणार असल्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. यासोबतच येत्या काळात सरकार फिटमेंट फॅक्टरसंदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. यासाठी मसुदा तयार करण्यात येणार असून जुलै महिन्यात यासंदर्भातील बैठक घेतली जाणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने सहमती दर्शवल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात फिटमेंट फॅक्टरअंतर्गत वाढ होणार आहे, असे झाल्यास फिटमेंट फॅक्टर अंतर्गत ५२ लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढू शकते.
( हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला)
केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२२ पासून नवा महागाई भत्ता लागून होणार आहे. AICPIच्या आकडेवारीनुसार १ जुलैपासून महागाई भत्ता हा ४ ते ५ टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजेच डिए ३८ ते ३९ टक्के असेल. फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून ३.६८ एवढा वाढवण्याची मागणी कर्मचारी संघटनांमार्फत करण्यात येत आहे.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
- फिटमेंट फॅक्टर हा घटक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच पटीने वाढ करतो. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्त्यांव्यतिरिक्त त्यांचे मूळ वेतन आणि फिटमेंट फॅक्टरद्वारे निर्धारित केले जाते.
- सातव्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर ७००० X २.५७ = १८ हजार रुपये
- तसेच सातव्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर ३ लागू झाल्यास ७००० X ३ = २१ हजार रुपये