तृतीय पंथीय या समाजातील दुर्लक्षित घटकाला स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना सरकारने आत्मनिर्भर बनवण्याची नितांत गरज बनली आहे, कारण कोरोनाच्या कालखंडात मागील ६-७ महिन्यांच्या लॉक डाऊनमध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लोकल गाड्यांमध्ये किंवा रस्त्यांवरील सिग्नलवर भीक मागून पैसे कमावणे, हेच एकमेव माध्यम तृतीय पंथियांकडे जीवन जगण्यासाठी आहे. यामुळेच लॉक डाऊनमध्ये त्यांची केविलवाणी स्थिती झाली.
कोरोनामुळे सध्या मुंबईमध्ये लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र करोनामुळे ना त्यांना लोकलमध्ये जाता येतं ना सिग्नलवर उभे राहता येतं. त्यामुळे कोरोना काळात ना त्यांच्या हातात पैसा मिळाला ना कुणी त्यांच्यासमोर जेवणाची थाळी पुढे केली.
सरकारी मदतीपासूनही वंचीत
ना रेशनकार्ड ना धान्य
तर समाजामध्ये आधीच तृतीय पंथीय दुर्लक्षित होतेच, परंतु कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा घटक आणखीच दुर्लक्षित झाला आहे. अनेक तृतीयपंथी गलिच्छ वस्तीत एकटेच घरात राहत असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. सरकार आमच्या परिस्थितीकडे कधी लक्ष देणार?, असे तृतीयपंथीय शोभा म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community