जुलै महिना सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार बॅंकेचे व इतर महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करतात. तुम्ही सुद्धा बॅंकेचे व्यवहार करणार असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जुलै महिन्यात कामाच्या दिवसांपेक्षा सुट्ट्याच जास्त आहेत. त्यामुळे खातेधारकांची गैरसोय होऊ शकते. यामुळे आतापासूनच जाणून घ्या की, जुलै महिन्यात बॅंका केव्हा सुरू असतील आणि केव्हा बंद…
( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा!)
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जुलै महिन्यात एकूण १६ दिवस बॅंका बंद असणार आहेत. आरबीआयने बॅंकांच्या सुट्ट्यांची ३ श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये Negotiable Instruments act, Real Time Gross Settlement holiday आणि Bank closing of accounts याचा समावेश आहे. जुलैमध्ये बॅंका केव्हा बंद असणार याची यादी पाहूया…
जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी
- १ जुलै – कांग ( रथजात्रा)/ भुवनेश्वर आणि इंफालमध्ये बॅंक बंद
- ३ जुलै – रविवार
- ५ जुलै – गुरू हरगोविंद प्रकाश दिवस – जम्मू काश्मीरमध्ये बॅंका बंद
- ६ जुलै – एमएचआईपी दिवस – मिझोरममध्ये बॅंका बंद
- ७ जुलै – खर्ची पूजा – आगरतला
- ९ जुलै – दुसरा शनिवार, बकरी ईद
- १० जुलै – रविवार
- ११ जुलै – ईज-उल-अजा – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बॅंका बंद
- १३ जुलै – भानू जयंती – गंगटोकमध्ये बॅंका बंद
- १४ जुलै – बेन डिएनखलाम – शिलॉंग
- १६ जुलै – हरेला – डेहराडून
- १७ जुलै – रविवार
- २३ जुलै – चौथा शनिवार
- २४ जुलै – रविवार
- २६ जुलै – केर पूजा – आगरतला
- ३१ जुलै – रविवार