भारत आणि इंग्लंड कसोटी सामना पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणार आहे. पण कसोटीपूर्वी मात्र क्रिकेट प्रेमींच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आली आहे. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननंतर आता भारताचा मुख्य फलदांज विराट कोहलीची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.
यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, आता तो बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लीसेस्टरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. यातच विराट कोहलीची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.
( हेही वाचा: बच्चू कडूंनी शिवसेना आमदारांच्या नाराजीचे कारण सांगितले म्हणाले; “ज्या पद्धतीने…” )
विराटची आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी
आयपीएलमध्ये अनेक विक्रमाला गवसणी घालणा-या विराट कोहलीसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम अतिशय खराब ठरला आहे. या हंगामात तो तीन वेळा गोल्डन डकचा शिकार ठरला आहे. राॅयल चॅलेंजर्सकडून खेळताना, त्याने 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीने 341 धावा केल्या. ज्यात फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community