केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर

179

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अखेर ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे केतकी चितळेवर अॅट्रोसिटी प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणातही ठाणे न्यायालयाकडून 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. केतकीने 1 मार्च 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त पोस्टप्रकरणी तिच्या अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

( हेही वाचा: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्याचे सूचक वक्तव्य, म्हणाले…)

नेमके काय झाले होते

अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत टीका केली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने ही पोस्ट लिहीली होती. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातही केतकीवर गुन्हा दाखल झाल्याने, केतकी चितळे अडचणीत आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.