इन्श्योरन्सचे पेपर हरवले तरी नो टेन्शन, असा करता येईल क्लेम

151

आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी प्रत्येक जण हा इन्श्योरन्स पॉलिसी काढत असतो. या इन्श्योरन्सचा फायदा पॉलिसीधारकांना टॅक्स वाचवण्यासाठी किंवा भविष्यात जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी होतो. पण इन्श्योरन्सची कागदपत्रे हरवली तर काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. अशावेळी आपण क्लेम कसा करायचा असाही प्रश्न आपल्याला पडतो. त्यासाठीच ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे.

असा करता येईल क्लेम

जेव्हा विमा पॉलिसी काढला जातो तेव्हा पॉलिसीधारकाला काही कागदपत्रे देखील दिली जातात. या कागदपत्रांना बाँड म्हटले जाते. हा बाँड ठराविक कालावधीत रक्कम भरून व्यक्तीला विमा मिळाल्याचा पुरावा आहे. पॉलिसीशी संबंधित सर्व माहिती बाँडच्या सुरुवातीच्या कागदावरच असेल. त्यावरील माहितीनुसार पॉलिसीवर दावा सांगत आपल्याला क्लेम करता येऊ शकतो. मात्र, हा बॉंडच हरवला तर खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा बॉंड जपून ठेवणे आवश्यक आहे.

बाँडवर स्वाक्षरी आवश्यक

तसेच विमा पॉलिसी हरवल्यास पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदणी देखील करू शकता. यासोबतच तुम्हाला नुकसानभरपाईचा कागद (क्षतिपूर्ती बाँड) भरावा लागेल. पॉलिसीवर इतर कोणीही दावा करू शकत नाही म्हणून नुकसानभरपाई बाँडवर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉलिसीचा मालक असल्याचा दावा अन्य कोणी केल्यास त्याच्यावरही योग्य ती कारवाई होऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.