‘बेस्ट’ची Digital सेवा मुंबईकरांसाठी ठरतेय ‘BEST’!

160

मुंबईमध्ये सुखर आणि सोयिस्कर प्रवास करण्यासाठी बेस्ट बस सर्वात्तम पर्याय मानले जाते. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी बेस्ट प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वाधिक करण्याच्या प्रयत्नावर भर दिला आहे. यामुळेच बेस्टची डिजिटल सेवा मुंबईकर प्रवाशांसाठी फायदेशीर ठरताना दिसतेय. तसेच मुंबईकरांना वेळेचे नियोजन करणे शक्य झाले असून गेल्या तीन महिन्यात बेस्टने प्रवाशांचा एक लाख दिवसांचा वेळ वाचवल्याचे सांगितले जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर बेस्टचा अधिक भर

बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक भर दिला जात आहे. तसेच शहरी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी याकरता डिजिटल सिस्टीमवर जोर दिला जात आहे. याकरता बेस्टमध्ये स्वयंचलित व्यवस्था सुरू करण्यात आली. प्रवाशांसाठी याअंतर्गत चलो अॅप, स्मार्ट कार्ड अशा योजना सुरू केल्या गेल्या.

(हेही वाचा – …जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, “मी आणि माझे कुटुंब शिवसेना सोडायला तयार…”)

अन् मुंबईकरांचा प्रवास झाला सुखकर 

डिजिटल सुविधांमुळे मुंबईत प्रवाशांना प्रवास करणं सहज आणि सोयिस्कर झाले आहे. याद्वारे प्रवाशांना घरबसल्या ऑनलाईन रिचार्ज करणं शक्य झाले आहे. वाहक-प्रवाशांचा वाद संपला. पास-तिकिटांसाठी लांबच लांब रांगा संपल्या. बसेसचे मार्ग, प्रवासासाठी लागणारा वेळ, बसचे लोकेशन, बसची माहिती, बसमधील रिक्त जागा याची माहिती एका क्लिकवर मिळू लागली यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला. बेस्टने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत दररोज ३० लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. गेल्या तीन महिन्यात ६० टक्के प्रवाशांनी ऑनलाईन रिचार्ज करण्याचा लाभ घेतला. तर १२ टक्के प्रवासी डिजिटल तिकीट खरेदी करत आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.