देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही पेन्शनधारक असाल तर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र पेन्शनर्स कल्याण विभाग (DOPPW) देशातील सर्वात मोठी बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या सहकार्याने एक पोर्टल सुरू करणार आहे. या ‘एकीकृत पेन्शन पोर्टल’च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांना मिळणार उधारीवर तिकीट; Buy Now Pay Later ची सुविधा तुम्हाला माहिती आहे का?)
सरकारी निवृत्तीवेतनधारकांना फायदा
पेन्शनधारकांना अखंड सेवा देण्यासाठी केंद्र पेन्शनर्स कल्याण विभाग ( DoPPW) आणि SBI बॅंकेच्या विद्यमान पोर्टलला जोडून एक एकीकृत पेन्शन पोर्टल तयार करण्याची आवश्यकता असून, सरकारकडून लवकरच नवे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. देशभरातील 60 लाखांहून अधिक सरकारी निवृत्तीवेतनधारकांना याचा फायदा होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने देशभरात चार जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. निवृत्ती वेतन देणाऱ्या इतर बँकांच्या सहकार्याने सुद्धा अशा प्रकारची जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेटची सुविधाही उपलब्ध असेल
सरकारच्या निवेदनानुसार, पेन्शनधारकांना अखंड सेवा प्रदान करण्यासाठी DoPPW आणि SBI च्या विद्यमान पोर्टलला जोडून एक एकीकृत पेन्शन पोर्टल तयार करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. डिजिटल लाइफ सर्टिफिकेटसाठी ‘फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी’ची बँकांकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, या कार्यक्रमांमुळे पेन्शनधारकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community