कोणाला काय उत्तर द्यायचे, याचे अधिकार आमच्या नेत्यांना आहेत. नारायण राणे हे शरद पवारांना काय म्हणाले, ते पाहावे लागेल. मात्र आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. एकूणच नारायण राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याचे त्यांनी कोल्हापूरात बोलत असताना समर्थन केल्याचे पाहायला मिळाले.
(हेही वाचा – ‘शिवसेने’चा आकडा कमी झालाय, संजय राऊतांनीच केलं मान्य म्हणाले…)
शरद पवार आणि नारायण राणे काय म्हणाले मला माहित नाही. पण शरद पवार आणि संजय राऊत यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा जास्त आहे, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार आणि महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता असताना राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्या पार्टीतील नेत्यांना इतरांनी टीका केल्यास त्याला उत्तर देण्याचे अधिकार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीबाबत अनभिज्ञ असून या घटनांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ज्या काही घडामोडी आहेत, त्या टिव्हीवरच पाहायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते पवार?
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल आणि सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. यादरम्यान शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावंच लागेल. त्यांनी बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईत यावेच लागेल, तसेच आमदारांना बंडोखोरीचे परिणाम भोगावे लागतील असेही शरद पवार म्हणाले.
राणेंनी दिला इशारा
या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत थेट शरद पवारांना इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना राणे म्हणाले की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असा इशारा राणेंनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community