Facebook- Instagram वरुन असे कमवा लाखो; मार्क झुकरबर्गने आणले हे नवे फीचर्स

180

सोशल मीडिया प्लॅटफाॅर्ममध्ये फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफाॅर्मचा वापर हल्ली प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडियाचा वापर केवळ नातेवाईक, कुटुंबातले सदस्य, कार्यालयीन सहकारी आदिंशी कनेक्ट राहण्यासाठी केला जातो. इन्साग्राम हे प्रामुख्याने रील्स, व्हिडिओ आणि फोटो शेअरिंगसाठी वापरले जाते. फेसबुकचा वापर यासोबतच चॅटिंग आणि कंटेंट शेअरिंगसाठीही होतो. जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्ममधून लाखो रुपये सुद्धा कमवू शकता, असे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले आहे.

क्रिएटर मार्केटप्लेस हे देखील एक अनोखे फिचर

मार्क झुकरबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर्स वापरून लाखो रुपये कमवता येतात. त्यात फेसबुक स्टार्स, मोनेटायझिंग रील्स आणि इंटरऑपरेबल सब्सस्क्रिप्शनचा समावेश असेल. क्रिएटर मार्केटप्लेस हे देखील एक अनोखे फिचर असेल. मार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटाने इन्स्टाग्रामवार या फीचरचे टेस्टिंग सुरु केले आहे. या माध्यमातून क्रिएटर्सना सर्च आणि पेमेंट केले जाईल. या माध्यमातून ब्रॅंड पार्टनरशीपच्या नव्या संधी शेअर करता येतील. इंटरऑपरेबल सब्सस्क्रिप्शन (Interoperable Subscription) फीचरच्या माध्यमातून सब्सक्रायबरने ज्या क्रिएटरसाठी पेमेंट केले आहे, अशा सब्सक्रायबरला Subscription only facebook groups मध्ये प्रवेश देईल.

( हेही वाचा: शाळा भरताना आवडीने म्हटली जाणारी ‘प्रतिज्ञा’ कोणी लिहिली माहितीय का? )

हे फीचर वापरुन रील्स, लाईव्ह करता येणार

क्रिएटर्ससाठी फेसबुक स्टार्स नावाचे (Facebook starts) फीचर सुरु करण्यात आले आहे. यामुळे अधिकाधिक लोकांना रिल्स, लाईव्ह किंवा व्हिडिओच्या माध्यमातून कमाई करता येईल. मेटा कंपनी क्रिएटर्ससाठी रील्स प्ले प्रोग्राम सुरु करणार आहे. त्यामुळे आता या फीचर्सचा वापर करुन, युजर्सना लाखो रुपये कमवता येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.