शिंदे गटाला मोठा झटका! गटनेतेपदी अजय चौधरी तर प्रतोदपदावर सुनील प्रभूंची निवड

179

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात मोठी राजकीय बातमी आहे. सुरू असलेल्या सत्ता पेचात शिंदे गटाला मोठा झटका बसल्याचे समोर आले आहे. शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोदपदावर सुनील प्रभू यांना मान्याता मिळाली असून ती मान्यता विधीमंडळाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मान्यता दिली आहे. गटनेते शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी गटनेतेपदावर दावा केला होता. मात्र झिरवळ यांनी शिंदेंचा दावा फेटाळला असून आता नियमानुसार अजय चौधरी यांची विधीमंडळात नोंद केल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे पुढे कोणती पाऊलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर पुढची भूमिका ठरवण्यासाठी शिंदेंना न्यायालयात दाद मागवी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बुधवारी एक पत्र पाठवून पक्षाच्या सभेला उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी थेट भरत गोगावले यांची शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली. त्यांनी एक ट्वीट करत याबबातची माहिती दिली होती.

काय होतं शिंदेंचे ट्वीट

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश हे कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले होते. तसेच गोगावले यांची नियुक्ती झाल्याचे पत्रही त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले होते. मात्र विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी गटनेतेपदी अजय चौधरी तर प्रतोदपदावर सुनील प्रभूंची निवड केल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.