शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर, ते आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. मात्र याबाबत कोणतीही माहिती प्रशासनाला लागली नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कमांडो आणि काॅन्सटेबल यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा राज्यातल्या परिस्थितीत हस्तक्षेप करा; भाजपची राज्यपालांकडे मागणी )
कारणे दाखवा नोटीस
राज्य सरकार या सर्व अधिका-यांवर कारवाई करणार आहे. या सर्व आमदारांनी बंड केल्यानंतर, महाराष्ट्राची हद्द सोडत असताना, या सर्व अधिका-यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती न दिल्याने या सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community