वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शासनाने तात्काळ रिक्त पदे भरावीत याकरता सर्व संघटना आणि कृती समितीद्वारे आंदोलन करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता यश आले असून लवकरच १०० टक्के पदभरती केली जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय २३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
( हेही वाचा : New Labour Code : १ जुलैपासून नवे कामगार कायदे! खासगी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सुट्ट्यांमध्येही होणार मोठा बदल )
कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होण्यास मदत
वर्ग ४ संवर्गातील २५० पेक्षा जास्त पदे जे.जे. रुग्णालयात रिक्त असून, त्यांना सुद्धा वारंवार डबल ड्युटी करावी लागत आहे. परिणामी दोन कर्मचाऱ्यांचे काम एका कर्मचाऱ्याला करावे लागत असल्याने कर्मचारी वर्ग त्रासलेला आहे. शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार सदरची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाल्यास सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील जास्तीच्या कामाचा बोझा कमी होईल, असे कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community