पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यात, ‘प्रशासन ऑन व्हील’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार पर्यटन विभागाच्या Carvan व्हॅनचा वापर करण्यात येत आहे.
कारव्हान व्हॅनचा वापर
आषाढी वारी दरम्यान प्रशासनाला नियोजन करणे सोयीचे व्हावे याकरता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी फिरत्या कार्यालयाची संकल्पना मांडली होती. त्यानुसार नियोजनासाठी महाराष्ट्र पर्यटनाच्या कारव्हान व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे. ही एक मिनी बस असून यात ८ ते १० लोकांच्या बैठकीची व्यवस्था आहे. या व्हॅनमध्ये उत्तम मोबाईल संपर्क असतो. पालखी सोहळ्यात लाखो मोबाइल कार्यरत असल्याने अनेकवेळा नेटवर्कअभावी फोन लागत नाहीत. मात्र या व्हॅनमुळे संवादासाठी चांगले नेटवर्क उपलब्ध होऊ शकते.
( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)
याचा फायदा आपत्कालीन तसेच इतर महत्वाच्या संदेशांसाठी केला जाणार आहे. हे वाहन जिल्हा हद्दीत असलेल्या निरा गावापर्यंत वापरले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन परिवहन कार्यालयाने ठरवून दिलेल्या दरानुसार पर्यटन विभागाला भाडेदर देण्यात येणार आहे.
यंदा प्रथमच कारव्हान व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. वारीचे प्रत्यक्ष रस्त्यावरील संपूर्ण नियोजन व समन्वय त्यांच्याकडे असेल. पालखी मुक्कामासह वारी मार्गावरही शौचालये असून त्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community