मतदार यादीत नाव चुकलंय का, तपासा या संकेतस्थळावर; १ जुलैपर्यंत आहे नावातील चूक सुधारण्याची संधी

238

मुंबई महापालिकेच्या निवडणुकी करता २३६ प्रभाग बनवण्यात आल्यानंतर आता प्रत्येक प्रभागातील मतदार याद्या सुधारीत करून या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आले आहे. या मतदार नोंदणीमध्ये सुमारे ७ लाख मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे या मतदार यादीमध्ये आपले नाव बरोबर आहे किंवा बाजूच्या प्रभागात नोंदले गेले याची माहिती आता महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. जर आपले नाव मतदार यादीत नसेल किंवा चुकले असेल किंवा अन्य प्रभागात नोंदवले गेले असेल तर त्यावरीत महापालिकेच्या विभाग कार्यालयात अर्ज करून यादीतील नाव सुधारीत करून घ्या. ही मुदत फक्त १ जुलैपर्यंत असून या कालावधीत जर आपण सुधारणा न केल्यास येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क गमावू शकता.

१ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२ करिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्यी प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत प्रभाग बदलला असल्यास योग्य प्रभागात समाविष्ट करणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभाग यादीत नसेल तर अंतर्भूत केले जाईल.

राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या दिनांक २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्या मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तसेच मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन खात्यातील निवडणूक विभागात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर दिनांक १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व दिनांक ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना नवीन नावांचा समावेश किंवा नावांची वगळणी इत्यादी कार्यवाही करण्यात येणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

( हेही  वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)

हरकती व सुचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलला असेल तर योग्य प्रभागात नाव समाविष्ट करणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसेल, तर नाव अंतर्भूत करणे इत्यादी दुरुस्त्या करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या दुरुस्त्या करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील, करनिर्धारक व संकलक यांचे कार्यालयातील निवडणूक विभागात नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे. या प्रसंगी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे व निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.