मध्य रेल्वेवर २५ व २६ जून २०२२ रोजी (शनिवार/रविवार रात्री) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
- भायखळा- माटुंगा (शनिवार/रविवार रात्री) जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ४.३० पर्यंत आणि जलद मार्गावर मध्यरात्री ००.४० ते पहाटे ५.४० पर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५.२० वाजता सुटणारी जलद गाडी भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवली जाईल व वेळापत्रकानुसार निर्धारित थांब्यावर थांबेल.
- ठाणे येथून रात्री १०.५८ ते ११.१५ पर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायवर्जन
- मेल/एक्सप्रेस ट्रेन 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव जन शताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवली जाईल आणि रोहा येथे निर्धारित वेळेपेक्षा १० ते १२ मिनिटे उशिराने पोहचेल.
- 11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा -मुंबई मेल माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथे सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द
- पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई साठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
- तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.