उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरूस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यंदाच्या रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : मुलीच्या नावे जमा होणार ५० हजार रुपये! जाणून घेऊया ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेविषयी…)
पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी १०.५५ ते ४.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक
- या ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. तसेच चर्चगेट ते गोरेगावदरम्यान धावणाऱ्या काही लोकल सेवा रद्द असतील. याशिवाय ब्लॉक कालावधीत माहिम स्थानरांवरील रि-अलाइनमेंटचे काम पूर्ण होताच सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल माहिम स्थानकांवर थांबतील.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
- भायखळा- माटुंगा (शनिवार/रविवार रात्री) जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ४.३० पर्यंत आणि जलद मार्गावर मध्यरात्री ००.४० ते पहाटे ५.४० पर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५.२० वाजता सुटणारी जलद गाडी भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवली जाईल व वेळापत्रकानुसार निर्धारित थांब्यावर थांबेल.
- हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक
- पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई साठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
- ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.