शिवसैनिकांनी आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले

133

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय शनिवारी शिवसैनिकांनी फोडले. शिवसैनिकांनी सावंत यांच्या साखर कारखान्याच्या बोर्डालाही काळे फासले. यावेळी सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेचे पुण्यातील नगरसेवक विशाल धनवडे आणि त्याच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी मिळून शनिवारी सकाळी कात्रज परिसरातील तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या बोर्डाला काळे फासले आणि त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली.

( हेही वाचा : कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढले नाही; गृहमंत्री वळसे पाटलांनी एकनाथ शिंदेंचे आरोप फेटाळले)

शिवसैनिकांनी बंडखोर नेत्यांविरोधात आक्रमक

ही घटना घडल्यावर भारती विद्यापीठ परिसरातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान राज्याभरात शिवसैनिक बंडखोर नेत्यांविरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं ट्वीट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.