शिवसेनेतील ३५ आमदारांसह बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्याच्या राजकारणातील एकनाथ शिंदे गटाने स्वतःच्या नव्या गटाची स्थापना केली, त्याला ‘शिवसेना बाळासाहेब गट’ असे नाव दिले आहे, अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.
संध्याकाळी ४ वाजता अधिकृत घोषणा होणार
शुक्रवारी, २४ जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि ठाकरे नाव न घेता जगून दाखवा, असे म्हणाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने ‘शिवसेना बाळासाहेब गट’ असे नाव देण्याचे ठरले. ‘शिवसेना बाळासाहेब’ असे आमच्या गटाचे नाव ठेवले आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचे अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेले नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, पण विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले. शनिवारी दुपारी 4 वाजता शिंदे गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे. यावेळी ही अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा शिवसेनेची फरपट)
Join Our WhatsApp Community