विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह गटातील १६ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी एकनाथ शिंदे गटाने झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र झिरवळ यांनी हा प्रस्ताव तांत्रिक मुद्द्यावरून फेटाळून लावला.
तांत्रिक मुद्यावर घेतला निर्णय
हा प्रस्ताव इमेल द्वारे पाठवला होता, तसेच असा प्रस्ताव ज्या परिशिष्टाच्या माध्यमातून पाठवायचा असतो, त्या परिशिष्ठातून हा प्रस्ताव पाठवण्यात आला नाही. त्याच बरोबर हा प्रस्ताव देताना आवश्यक आमदारांच्या स्वाक्षरीची सत्यता नव्हती, अशी कारणे झिरवळ यांनी दिली आहेत. या कारणास्तव झिरवळ यांनी हा अविश्वासाचा ठराव फेटाळून लावला आहे. तसेच गटप्रमुख पदी सुनील प्रभू यांची नियुक्ती योग्य ठरवली आहे. शिवसेनेतील ३५ आमदारांसह बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्याच्या राजकारणातील एकनाथ शिंदे गटाने स्वतःच्या नव्या गटाची स्थापना केली, त्याला ‘शिवसेना बाळासाहेब गट’ असे नाव दिले आहे, अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.
(हेही वाचा शिंदे गटाचे नवे नाव ‘शिवसेना बाळासाहेब गट’)
Join Our WhatsApp Community