अपघातात टिकून राहण्याची चाचणी म्हणजेच क्रॅश टेस्टमध्ये केलेल्या कामगिरीनुसार, वाहनांना स्टार रेटिंग देण्यात येणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे.
गडकरी म्हणाले की, नवीन कार समीक्षा उपक्रम म्हणजेच भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रामने हा स्टार रेटिंग्जचा प्रस्ताव आणला आहे. हा उपक्रम ग्राहक केंद्रित मंचाच्या स्वरुपात काम करेल. ग्राहकांना स्टार रेटिंग्जच्या आधारे आपल्या आवडीची सुरक्षित कार निवडण्याचा पर्याय त्यातून मिळेल. त्याचवेळी मुलभूत उपकरण निर्मात्यांना निर्भेळ स्पर्धेचे वातावरण मिळेल. त्यातून भारतात अधिक सुरक्षित वाहने उत्पादित होतील, असे नितीन गडकरी म्हणाले.
आताच भारत एनसीएपी सुरु करण्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्यात मंजुरी दिली आहे. भारत एनसीएपी देशात वाहनांना क्रॅश टेस्टमधील कामगिरीनुसार स्टार रेटिंग्ज दिले जाईल, असे नितीन गडकरी म्हणाले.
( हेही वाचा बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना! शिवसेनेच्या कार्यकारणीत ठराव मंजूर )
कोणत्या कार फेल
- मारुती सुझुकी इको
- महिंद्रा स्काॅर्पिओ
- ह्युंदाई इआॅन
- मारुती सुझुकी सेलेरिओ
- रेनाॅल्ट क्विड
कोणत्या कार सुरक्षित
- महिंद्रा एक्सयूव्ही
- टाटा अल्टोज
- टाटा नेक्साॅन
- महिंद्रा माराझो
- टाटा टिआगो
निर्यातक्षम वाहनांच्या निर्मितीस प्रोत्साहन
गडकरी यांनी पुढे सांगितले की, भारतीय कार ग्राहकांसाठीच नव्हे, तर अधिकाधिक निर्यातक्षम वाहने उत्पादित करण्यासाठीही स्टार रेटिंग्ज व्यवस्था आवश्यक आहे. भारत एनसीएपीचा टेस्टिंग प्रोटोकाॅल हा जागतिक क्रॅश टेस्टच्या समकक्ष असेल. मुलभूत उपकरण निर्मात्यांना भारताच्या ईन-हाऊस टेस्टिंग सुविधेत आपल्या उपकरणांची अपघात चाचणी करता येईल.