भारतीय स्टेट बॅंकेच्या (SBI) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असून आता बॅंकेच्या ग्राहकांना घरबसल्या अनेक कामे करणे शक्य होणार आहे. या सुविधेसाठी SBI ने दोन टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून तुम्ही घरबसल्या बॅंकेशी निगडीत काही महत्वाची कामे सहज पद्धतीने करू शकता. या सुविधेमुळे ग्राहकांना रविवारी बॅंक बंद असली तरी एका फोनमुळे रखडलेले काम करता येणार आहे. यासंदर्भात SBI ने ट्वीट करत माहित दिली आहे.
SBI बॅंकेने ट्वीट करत 18001234 आणि 18002100 हे दोन टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत.
SBI च्या या टोल फ्री क्रमांकावरून संपर्क साधल्यास ग्राहकांना खालील माहिती मिळेल…
- शिल्लक रक्कम आणि शेवटच्या ५ व्यवहारांची माहिती मिळेल.
- ATM ब्लॉक करणे किंवा नवीन कार्ड स्थिती जाणून घेऊ शकता.
- चेक Dispatch स्थिबद्दल माहिती मिळू शकते.
- ग्राहक टीडीएस कपाती संदर्भात माहिती घेऊ शकतात. तसेच ई-मेलद्वारे व्याजप्रमाणपत्र सादर करू शकतात.
- जुने ATM ब्लॉक केल्यानंतर ग्राहक नव्या ATM साठी अर्ज करू शकतात.
https://twitter.com/TheOfficialSBI/status/1539930594867843072
बॅंकेकडून व्याज दरात वाढ
बॅंकेने १४ जूनपासून एफडीचे व्याजदर बदलले असून SBI ने २११ दिवस ते ३ वर्षांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या FD चे व्याजदर १५ ते २० बेस पॉईंट्सनी वाढवले होते.
Join Our WhatsApp Community