एकनाथ शिंदे गटाकडे दोन तृतीयांश आमदार संख्या आहे. आमच्याकडे स्पष्ट आकडा आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. अशा वेळी आम्हाला महाराष्ट्रात येणे असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी वातावरण शांत ठेवण्याचे आदेश द्यावेत, तेव्हाच आम्ही महाराष्ट्रात येऊ, असे शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर म्हणाले. शिंदे गटाची भूमिका मांडण्यासाठी झूम वर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
आम्ही शिवसैनिकच!
आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाहीत. काल आम्ही शिवसैनिक होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. आमचे एकच म्हणणे आहे की, शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली मात्र त्यानंतर दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मात्र त्यामध्ये महत्वाची खाती दोन्ही काँग्रेसला दिली आणि मुख्यमंत्रीपद फक्त शिवसेनेला दिले. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना वारंवार दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यांकडे हात पसरावे लागले. मुख्यमंत्र्यांकडील आमदार म्हणून जर आदर मिळाला असता तरी आनंद वाटला असता मात्र शिवसेनेच्या आमदारांची कामे झालीच नाही. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी निर्माण होत गेली. भाजपसोबत सरकार स्थापन झाले होते तेव्हा कामे झाली नाही तरी वाईट वाटले नव्हते मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर अपेक्षा वाढली होती मात्र अपेक्षाभंग होत राहिला. अखेर शिवसेनेच्या आमदारांना त्यांची कामे होत नाहीत, म्हणून पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून येऊ का, याचीच शास्वती वाटू लागली नाही, म्हणून अखेर आमदारांनी हा निर्णय घेतला आहे, असेही आमदार केसरकर म्हणाले.
(हेही वाचा शिंदे गटाचे नवे नाव ‘शिवसेना बाळासाहेब गट’)
Join Our WhatsApp Community